आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा व राज्य स्तरावर खेळ:नगरपरिषदेच्या शाळा क्र. 18 मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद व नगरपरिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपरिषद शाळा क्रं. १८ मध्ये आयोजित क्रीडा सप्ताहाचे सोमवारी (दि.१२) जिल्हा क्रीडा अधिकारी पार्थ लटके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पार्थ लटके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज खेळले पाहिजे. जिल्हा व राज्य स्तरावर खेळण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्यास नोकरीमध्येही आरक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. डी. घंटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह गीताचे गायन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. डी. घंटे, बी. एल. करवर, एस. आय. पिरजादे, एस. एच. बुलबुले, ए. झेड. अन्सारी, आर. एस. देशमुख, एस. एच. कवडे, ए. आर. कनोजवार, ए. के. जावळे, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत करवर यांनी तर आभार पिरजादे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...