आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागरचना:कळंबमध्ये नगरपालिका; प्रारूप प्रभाग रचनेत बदल नाही

कळंब23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या वेळी दोन प्रभाग वाढले असून, प्रभागसंख्या १० झाली आहे.

डिसेंबरमध्ये नगरपालिकेचा पंचवार्षिक निवडणूक कालावधी संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. १० मे ते १४ मे २०२२ दरम्यान प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आले होते. ७ जून रोजी प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष आरक्षण सोडत, प्रभाग आरक्षण सोडत, असा टप्पा असणार आहे. नगरपालिकेने २० सदस्यांचे जाहीर प्रकटन चुकीचे असून कळंब नगरपरिषदेसाठी नियमाप्रमाणे २१ परिषद सदस्य होतात. प्रभाग क्र. ८ संदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुनावणी दरम्यान सबळ पुराव्याअभावी आक्षेप फेटाळण्यात आले होते. कळंब नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषदेत नवीन अध्यादेशाप्रमाणे १० प्रभाग करण्यात आले आहेत. २०२१ च्या जनगणनेप्रमाणे कळंब शहराची लोकसंख्या २५७१३ आहे. त्यात १० प्रभाग करण्यात आले आहेत.

काहीना प्रभाग सोपे
प्रभागाची रचना नव्याने करण्यात आली आहे. प्रभाग फुटल्याने काहीना प्रभाग सोपे झाले आहेत, तर काहीना आपण कुठे उभे राहावे, असा प्रश्न पडला आहे. नवखी मंडळी आपला प्रभाग सोईचा झाला आहे, असे सांगत आहेत.

प्रभाग व लोकसंख्या
प्रभाग-१ मध्ये २३३८ लोकसंख्या, प्रभाग-२ मध्ये २५८५ लोकसंख्या, प्रभाग-३ मध्ये २५९७ प्रभाग-४ मध्ये २५८७ प्रभाग-५ मध्ये २८०० प्रभाग-६ मध्ये २३८४ प्रभाग-७ मध्ये २३३१ प्रभाग-८ मध्ये २७९८, प्रभाग ९-मध्ये २७३४, प्रभाग-१० मध्ये २५५९ अशी लोकसंख्या आहे.

बातम्या आणखी आहेत...