आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:खून व खुनाचा प्रयत्न; चौघांना जन्मठेप

उमरगा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्घृण खून करणे व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना गुरुवारी (िद.२४) जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. संदीप देशपांडे यांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी आरोपीस जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली.

७ मार्च २०२० रोजी लोहारा तालुक्यातील जेवळी (उत्तर) येथे पद्माबाई शंकर कल्याणमोळ यांच्या घरासमोर आरोपी विलास लक्ष्मण भोसले (रा. सिंदगाव, ता. तुळजापूर), विशाल परमेश्वर शिंदे (ह.मु सिंदगाव (रा. कमलापुर जि. परभणी), किरण विलास भोसले (रा. सिंदगाव), फरार आरोपी अर्जुन विलास भोसले (रा सिंदगाव) यांनी फिर्यादी संतोष ज्ञानोबा पवार (रा. तुंगी ता. औसा जि. लातूर) (ह.मु जेवळी) व त्यांची पत्नी जयाबाई यांना तुम्ही आमच्या सोबत चोऱ्या करण्यासाठी का येत नाही, म्हणून आरोपी विलास भोसले, विशाल शिंदे, किरण याने फिर्यादीची पत्नी जयाबाई संतोष पवार यांचा खून केला व फिर्यादीच्या पाठीत वार केले.

त्यांच्यावर गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केले हाेते. यात डॉ. सीमा बळे, जनाबाई शिंदे, पद्मा कल्यामोळ, विजय गुरव, चिदानंद स्वामी, पीएसआय राठोड, एपीआय अशोक चौरे व तपासणी अधिकारी धनसिंग चव्हाण यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

बातम्या आणखी आहेत...