आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:सांगवी मार्डी शिवारात भर रस्त्यावर युवकाचा खून ; रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल

तामलवाडी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) शिवारात सोलापूर-धुळे महामार्गवर भर रस्त्यावर एका २८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याने खळबळ उडाली आहे. हा खून पूर्व वैमनस्यातून सख्या मावस भावाने केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तुळजापूर तालुक्यातील मसाला (खुर्द) येथील ज्ञानेश्वर नानासाहेब करंडे या युवकाचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर काका का ढाब्यासमोर गुरुवारी (दि.९) खून झाला. खून करणारा आरोपी सखा मावस भाऊ असून त्याने मावस भावाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी रामेश्वर खोचरे (रा.येवती) याने पूर्व वैमनस्यातून ज्ञानेश्वर करंडे याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने दिवसभर पाळत ठेवून एकटेपणाचा फायदा घेत संधी साधून सोलापूर-धुळे महामार्गवर दुचाकी चालवणाऱ्या ज्ञानेश्वर करंडे यांच्या मानेवर व पोटात धारदार कत्तीने वार करून खून केला. खून करताच आरोपी फरार झाला असून तुळजापूर व तामलवाडी पाेलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. खून झाल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत ज्ञानेश्वर नानासाहेब करंडे यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी असा परिवार परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...