आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा ठोठावली:वडिलांचा खून; मुलाला सश्रम कारावास

भूम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याच वडिलांच्या डोक्यात लाकडाने वार करून खून करणाऱ्या मुलाला न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भूम तालुक्यातील उमाचीवाडी येथील ठोंबरे वस्तीवर गेल्यावर्षी ही घटना घडली होती. भूमचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. माने यांनी शिक्षा ठोठावली.भूम तालुक्यातील उमाचीवाडी येथील ठोंबरे वस्ती येथील रहिवासी असलेले धनराज रंगनाथ ठोंबरे यांच्यात व त्यांची पत्नी सुनिता धनराज ठोंबरे, मुले विठ्ठल व प्रविण उर्फ पांडुरंग यांच्यात भांडण झाले. भांडणाचा राग मनामध्ये धरून धनराज यांच्या डोक्यात प्रविण याने लाकूड मारले.

त्यामध्ये धनराज याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भूम येथे गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षीदाराचा पुरावा तसेच परिस्थिीतीजन्य पुरावा ग्राहय धरून आरोपी प्रविण उर्फ पांडुरंग याला सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सुनिता व विठ्ठल यांना निर्दोष सोडण्यात आले. अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. प्रविण प्र. गाडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...