आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:साखरपुडा झालेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

तेरखेडा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यात गुरुवारी साखरपुडा झालेल्या अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय नराधमाने अत्याचार केला. मोबाइल मध्ये तिचे अश्लिल फोटो काढून प्रसारीत करण्याची धमकीही दिली. पीडितेचा २५ ऑगस्टला मामाच्या गावातील मुलासोबत साखरपुडा झाला. मुलगी तेथेच राहत होती. मात्र, होणारा नवरा पसंत नव्हता.

त्यामुळे ती मामाच्या घरी कोणास न सांगता बुधवारी (दि.२१) दुपारी अडीचच्या सुमारास तिच्या गावी जाण्यासाठी निघाली. दरम्यान, तिला अजय सरवदे (४०) याने मदतीचा बहाणा करुन सोबत नेत अत्याचार केला. तिची सुवर्ण अंगठी घेत वाच्यता केल्यास फोटो पसरवण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...