आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रोत्सव:संगीत, भेंड्या, गझल, मुलाखतीसह मनमुराद गप्पांनी रंगला स्नेहमेळावा ; अणदूर येथील जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी 30 वर्षांनंतर आले एकत्र

अणदूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर विद्यालयातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षानंतर त्यावेळच्या शिक्षकांसह निसर्गरम्य वातावरणात मैत्रोत्सव अर्थात स्नेहमेळावा साजरा केला. यावेळी कविता, संगीत, भेंड्या, गझल व मनमुराद गप्पातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांची आत्मीयतेने विचारपूस केली. अॅड. पंडित घुगे यांच्या विशेष मुलाखतीने सर्वांनी मने जिंकली. १९९२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्र-मैत्रिणींनी सकाळी आठ वाजता हजेरी लावली, त्यावेळचे शिक्षकही उपस्थित होते. निसर्गरम्य ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या बाजूला असलेल्या रिसॉर्टमध्ये या मैत्रोत्सवाची गर्दी फुलली. प्रथम शिक्षणमहर्षी कै. सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गुरुजनांनी आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे व सचोटीने वाटचाल करत असून आम्हास तुमचा अभिमान आहे, असा गौरव केला. या कार्यक्रमात मराठीचे सेवानिवृत्त शिक्षक भगीरथ कुलकर्णी यांची विद्यार्थी पंडित घुगे यांनी घेतलेल्या मुलाखतीने उपस्थितांची मने जिंकली. मैत्रोत्सवात ३० वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पाटप्पा, शालेय जीवनातील किस्से, गीत-संगीत, कविता, भेंड्या, गझल आदींना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती स्नेहमेळाव्यास महादेवप्पा नरे, श्रीमंत मुळे, भगीरथ कुलकर्णी, कराळे, एकुंडे, सुभाष लंगडे, काळे, सारणे, घुगे, बबन कंदले, वजीरकर, पाटील, जवाहरचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे आदी शिक्षक उपस्थित होते. दिनेश उगले, पंडित घुगे, प्रा. सचिन कंदले, आरती कदम, अनिता घुगे, डॉ. शिवशंकर कबाडे, खंडप्पा गोवे, सुधीर मुंडे, निता धरणे, प्रेम हुकीरे, मकरंद पाटील, डॉ. सुवर्णा आलुरे, प्रा. डॉ. सचिन कंदले, डॉ. विजय पवार,अमर नरवडे, श्रीशैल अंबारे, प्रा. लंगडे, कानडे, मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...