आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम सुरू ; कृषी विभागाची दखल

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्या. विविध पिकांचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत गुरूवारी (०१) तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गुरुवाडी शिवारात उपक्रम घेतले.

तालुकास्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. समस्यांमुळे शेतकरी अनेकदा टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा पर्याय निवडतात. पारंपरिक शेतीबरोबर सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. याबाबतचे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या जमिनीत अनेक पिकांचे नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी धजावत नाहीत.या सर्व गोष्टी लक्षात घेवून भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावरती उपायोजना राबविण्यासाठी राज्य शासनातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी डी. डी. भालेराव यांनी सांगितले. बांधावर जाऊन शेतीशाळा घेऊन पीक कीड व रोग व्यवस्थापन बदल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके दाखून उपक्रमाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना करण्यात आली. सायंकाळी उपस्थित शेतकरीबांधवांचे आभार मानून सांगता करण्यात आली.

लहरी हवामान आणि पावसामुळे तसेच पिकांवर पडणारे रोग, खते आणि बियाणाच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. काही भागात अतिपाऊस तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याने पिकांवर याचा वाईट परिणाम झालेला आहे. पीकविमा तसेच हमीभाव समाधानकारक नसल्याच्याही तक्रारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...