आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रा.गे.शिंदे महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट; महाविद्यालयाच्या वतीने सादर होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागांमधून रा.गे.शिंदे महाविद्यालय हे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून जिल्ह्यात नावारूपास आले आहे, असे प्रतिपादन माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.के.सपाटे यांनी व्यक्त केले.

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सर्व वरिष्ठ विभागाच्या टीमने नॅक मार्गदर्शनासाठी महाविद्यालयास भेट दिली होती तेव्हा त्यांनी या महाविद्यालयाचे सर्व कामकाज पाहिले. नॅकचा “अ “ दर्जा प्राप्त झाल्याने प्रत्येक विभागाने तयार केलेल्या आपल्या विभागाच्या फाइल्स तपासून प्रत्येक मार्गदर्शन घेतले. प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयक्यूएसी चेअरमन डॉ महेशकुमार माने यांनी नॅक संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सात क्रायटेरियाचे समन्वयक प्रा. जगन्नाथ माळी, प्रा.डॉ विद्याधर नलवडे, प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.डॉ.अक्षय घुमरे, प्रा.डॉ.संतोष काळे, प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा.डॉ. आर. के. देशमुख आदीनी विविध विभागाच्या तयार केलेच्या फाईल संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी माधवराव पाटील महाविद्यालयातील आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ. के. एच. रजपुत, प्रा.धुळेकर, प्रा.पी.डी. रजपुत, डॉ.महेश मोठे, डॉ. एस. एल.सूर्यवंशी, डॉ. बजगिरे, डॉ. व्ही. व्ही. खडके, डॉ. आर. डी. गणापुरे, डॉ.बी.एच.जाधव डॉ.एस.व्ही.पंचलेगल्ले, डॉ.आर.एम. देवशेटे, प्रा.एल.एम. पवार व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...