आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी मातेच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रतिष्ठापना:आलूर येथे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

आलूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील आलूर येथे बुधवारी नागपंचमी सण उत्साहात साजरा झाला. महात्मा बसवेश्वरांची मोठी बहीण अक्क नागम्मा यांची जयंती म्हणून शेजारील कर्नाटक राज्यात व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरे केला जातो. या दिवशी गौरी मातेच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रतिष्ठापना करून एक दिवसाचा सण साजरा केला जातो. या सणाला प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला माहेरी बोलावून घेतले जाते. प्रत्येक गावात मानाच्या घरी गौरी मातेची प्रतिष्ठापना केली जाते. आलूर येथे दरवर्षीप्रमाणे नागेश शंकरराव पाटील, शंकरराव अंदप्पा देशेट्टे (कारभारी), सिद्धप्पा उमशट्टे, सिद्धण्णा खुने व मल्लिनाथ खुने यांच्या घरी या देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दिवसभर सर्वांसाठी कर्नाटक स्पेशल खीर, चटणी,भजे-पापड अळा जेवणाची सोय केली होती.

दुपारी जेवणाचा कार्यक्रम संपल्यानंतर अक्क महादेवी महिला मंडळाकडून अक्क नागम्मा, गौरी माता व अक्क महादेवी यांच्यावरील गाण्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संसारावर आधारित अनुभवाचे, पती-पत्नी सुखी जीवन कसे जगावे, यावर आधारीत गाण्यांचा समावेश असतो. या गाण्यांचा कार्यक्रम संपल्यावर रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास गौरी देवीची पूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...