आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी उत्साहात साजरी:तुळजाभवानी मंदिरात भुलई खेळ खेळत नागपंचमी साजरी

तुळजापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी नागपंचमी साजरी करण्यात आली. सायंकाळी महिलांनी फेर, भुलई आदी खेळ खेळून नागपंचमी साजरी केली. प्रथेप्रमाणे सायंकाळी ५ ते ६ एक तास मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद होता. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

सासुरवासीन महिलांचा प्रमुख सण असलेली नागपंचमीला मंदिर परिसरात मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. मंदिरात होमकुंड समोर नागदेवतेच्या मूर्तीवर लाह्या, दूध अर्पण करण्यासाठी सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांत सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी कोरोनाचा कहर ओसरला असल्याने भाविकांचा मोठा उत्साह पहायला मिळाला. तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी सहा वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा मंगळवार निमित्त तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला.

महिलांचे पारंपरिक खेळ, दोन वर्षांनंतर उत्साह
प्रथेप्रमाणे नागपंचमीनिमित्त सायंकाळी पाच ते सहा एक तास पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता, यावेळी महिलांनी पारंपारिक खेळ खेळून नागपंचमीचा सण साजरा केला. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले असल्याने तब्बल दोन वर्षानंतर नागपंचमीला मंदिरात महिलांचा किलबिलाट जाणवला.

बातम्या आणखी आहेत...