आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची मागणी:‘एसपीं’ना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळास पोलिसांची मारहाण, नळदुर्गकर संतप्त

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथील विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी तुळजापूर येथे पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मध्येत अडवून शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे नळदुर्गवासीयांकडून दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने तुळजापुरातील भाविकांना आपल्याकडून त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या मागणीसाठी नळदुर्गचे शिष्टमंडळ पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथील पोलिस संकुलाकडे चालले होते.

त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिष्टमंडळातील भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके व संजय जाधव यांना गाडीतून उतरवत पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांच्या या कृत्याचा नळदुर्गकरांनी जाहीर निषेध केला. पाटील यांनी प्रकरणाची दखल घेत तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत गांभीर्य निदर्शनास आणून दिले. जखमी झालेले दासकर, भुमकर, गायकवाड व घोडके यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...