आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळदुर्ग शहरात शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने १३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या महिन्यात तीन महापुरुषांची एकत्रित भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो युवक व शिवप्रेमी नागरीक सहभागी झाले होते. शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने १० ते १३ मार्च २०२३ या कालावधीत या तीन महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. मिरवणुकीने या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
मराठा गल्ली येथून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली. त्याचबरोबर शोभेचे दारूकामही करण्यात आले. मिरवणूक चावडी चौकात आल्यानंतर भाजपचे मल्हार पाटील यांनी तीनही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले ते सोलापुर येथील जय भवानी संघाने दाखविलेले मर्दानी खेळ. जय भवानी संघातील युवक व युवतींनी दांडपट्टा फिरवणे, लाठी फिरवणे यासह अनेक मर्दानी खेळ दाखविले. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार अंधारे ,जिविशाचे धनंजय वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. समितीचे अध्यक्ष विजयसिंह ठाकूर, उपाध्यक्ष भिमाशंकर बताले, राकेश गायकवाड, सचिव अक्षय भोई, सहसचिव सागर कलशेट्टी, कोषाध्यक्ष राहुल दासकर, प्रमोद जाधव यांच्यासह शिवप्रेमी नागरीकांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.