आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यकारी सेवा:नारंगवाडी सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन अविरोध

उमरगा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नारंगवाडी (पश्चिम) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक अविरोध झाली. शुक्रवारी (दि.५) चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. माळी यांनी बैठक बोलावली होती.नारंगवाडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदासाठी महावीर पवार तर व्हाइस चेअरमनपदासाठी विजयसिंह राजपुत यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी श्री माळी यांनी निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी सचिव दत्तात्रय गंडाळे उपस्थित होते. निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोसायटीचे नूतन सदस्य निवृत्ती चिकुंद्रे, सतीश पवार, गोविंद पवार, लक्ष्मण आष्टे, अशोक चव्हाण, अरविंद पवार, शांताबाई पवार, काशिबाई सोमंवशी, शेषराव कांबळे, भीमाशंकर माळी, धोंडीराम घंटे उपस्थित होते. निवड अविरोध होण्यासाठी माजी जिप सदस्य शेखर घंटे, लिंबराज सोमंवशी, पी. व्ही. पवार, श्रावण जाधव, संजय पवार, विठ्ठल चिकुंद्रे, हरीभाऊ मुळे, अंगद पाटील, डिगंबर पवार, डिगंबर पाटील, राजेंद्र चिकुंद्रे, गोविंदसिंह राजपुत, विक्रम राजपुत, शिवपालसिंग राजपुत, प्रकाश आष्टे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...