आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना कडधान्य अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक गोदाम बांधकाम तसेच एक बीज प्रक्रिया संघ आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना गळीतधान्य अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक गोदाम बांधकामचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागविण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांना २५० मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १५ लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. व शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

बातम्या आणखी आहेत...