आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:बाळासाहेब सुभेदार यांना‎ राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार‎‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माहिती अधिकार कार्यकर्ते‎ बाळासाहेब सुभेदार यांना भटक्या‎ विमुक्त जमाती आयोगाचे माजी‎ राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांच्या‎ हस्ते ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय‎ गरुडझेप पुरस्कार प्रदान करण्यात‎ आला.ईगल फौंडेशनच्या वतीने‎ सामाजिक, राजकीय,‎ शैक्षणिक,औद्योगिक क्षेत्रात काम‎ करणाऱ्या व्यक्तींना गरुडझेप‎ पुरस्कार दिला जातो.‎

कोथरूड (पुणे) एमआयटी‎ विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात‎ भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे‎ माजी राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते‎ यांच्या हस्ते सुभेदार यांना पुरस्कार‎ प्रदान करण्यात आला.यावेळी ईगल‎ फौंडेशनचे संस्थापक विलासराव‎ कोळेकर, एमआयटी विद्यापीठाचे‎ अध्यक्ष विश्वनाथ कराड, डॉ.महेश‎ थोरवे आदी उपस्थित होते.‎ पुरस्काराबद्दल सुभेदार यांचे‎ अभिनंदन होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...