आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याचा सन्मान:राष्ट्रीय लसीकरणदिनी उत्कृष्ट आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकांचा सन्मान

उमरगा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनासह इतर लसीकरण मोहिमेतील कामगिरीचा गौरव

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी (दि.१६) राष्ट्रीय लसीकरण दिवसानिमित्त अनेक लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून १६ मार्च हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बुधवारी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पाडलेल्या राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमातील उत्कृष्ट एक आरोग्य सेविका व दोन आशा स्वयंसेविका यांचा तालुकास्तरावर सन्मान सोहळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या उपस्थित संपन्न झाला. गेल्या काही दशकांमध्ये टीबी, धनुर्वात, पोलिओ आणि आताच्या कोरोना आदी प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढ्यात लस महत्त्वाचे शस्त्र बनले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत सोहळा
राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून १६ मार्च हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बुधवारी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पाडलेल्या राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमातील उत्कृष्ट एक आरोग्य सेविका व दोन आशा स्वयंसेविका यांचा तालुकास्तरावर सन्मान सोहळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या उपस्थित संपन्न झाला. गेल्या काही दशकांमध्ये टीबी, धनुर्वात, पोलिओ आणि आताच्या कोरोना आदी प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढ्यात लस महत्त्वाचे शस्त्र बनले आहे.

लसीने अनेकांचे प्राण वाचवले, त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिनाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले. यावेळी येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्र, जकेकुर उपकेंद्राच्या आरोग्य सेविका रुपाली घोंगडे, मुळज केंद्रातील दाबका येथील आशा स्वयंसेविका वनिता गायकवाड व आलूर केंद्रातील कोथळीच्या करुणा गायकवाड यांचा तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. पी. एम. शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य केंद्र अंतर्गत येणेगूर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. पी. साळूंके, नाईचाकुर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासह समुदाय आरोग्य, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

लस नैसर्गिक संरक्षण करत संसर्गाचे धोका करते कमी
डॉ. प्रताप शिंदे म्हणाले की, लस धोकादायक किंवा प्राणघातक असू शकतील अशा रोगांना प्रतिबंध करण्यात मदत करतात. रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास लस शरीराच्या नैसर्गिक संरक्षणाचे कार्य करत संसर्गाचा धोका कमी करतात.

बातम्या आणखी आहेत...