आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:लोहारा बाजार समितीला जोडलेली 10 गावे देण्याची राष्ट्रवादीची मागणी

उमरगा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडलेली उमरगा तालुक्याची दहा गावे त्वरित उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीस जोडण्याच्या मागणी बुधवारी दि.२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे. प्रा. बिराजदार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून उमरगा तालुक्यातील दहा गावे राजकीय स्वार्थ व प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीस जोडली गेली आहेत.

उमरगा तालुक्यातील एकुरगा , एकुरगावाडी, बलसुर, कडदोरा, समुद्राळ , व्हंताळ , नारंगवाडी, जवळगाबेट, बाबळसुर, पेठसांगवी ही गावे उमरगा शहर व तालुक्या पासून दहा ते पंधरा किमी अंतरावर असतानाही ५० किमी अंतरावर असणाऱ्या लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीस काही राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी व बौद्धिक दिवाळखोरीत निघालेल्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जोडण्यात आले आहे.

याचा नाहक त्रास उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून शेतमाल पाठवताना जादा वाहन भाड्याचे भुर्दंड होत आहे. यासंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व निवेदन देऊनही याबाबत प्रशासन चाल ढकल करीत आहे . या संदर्भात कारवाई होऊन सदरील गावे उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती जोडण्यात यावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व या सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...