आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:खामसवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहील- सुरेश पाटील

कसबे तडवळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाअंतर्गत खामसवाडी, ता. कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा एस.पी.उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम अशा बैठकांमधून होते, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तळागळापर्यंत जाऊन काम करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात ऊस व सोयाबीन क्षेत्र मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्याने एस. पी. उद्योग समूहाच्या माध्यमातून एस.पी.शुगर व एस.पी सोलव्हंट च्या उद्योगातून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहील असा सुरेश पाटील यांनी शब्द दिला.

या बैठकीस जेष्ठ नेते दयानंद पाटील, शरद शेळके, प्रा.सुशिल शेळके, अतुल शेळके, सचिन शेळके, धनंजय शेळके, श्रीमंत शेळके,ऋषिकेश शेळके, राजाभाऊ शिंदे, कुलदीप घावटे, किसन शेळके, व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...