आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एक तास राष्ट्रवादीसाठी- प्रभावी, प्रगल्भ तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ उपक्रमांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी येथे शनिवारी (दि.४) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात आली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच गावपातळीवर वॉर्डनिहाय पक्ष संघटना, कशी वाढवता येईल यावर मंथन झाले. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवा. पक्षाची ध्येय-धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत एकजुटीने लढा देण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, युवा नेते सुदर्शन करंजकर, कसबे तडवळ्याचे माजी सरपंच मन्मथ आवटे, सुभाष जाधव, कोंबडवाडीचे सरपंच मुकुंद सोकांडे, उपसरपंच गुणवंत घाडगे, बंकट मिसाळ, भैरवनाथ गव्हाणे, अभिमान सोकांडे, गोरख सोकांडे, जग्गनाथ सोकांडे, गोपाळ जाधव, भीमराज सोकांडे, पोपट गावखरे, हनुमंत सोकांडे, बालाजी मिसाळ, नरसिंह सोकांडे, अजय सोकांडे, अनंत सोकांडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.