आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कृषिमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने ; सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत केले होते अवमानकारक विधान

उस्मानाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढून छ. शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत सत्तार यांच्या फोटोला जोडे मारले. सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात मागणी केली. यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, संजय निंबाळकर, मसूद शेख, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, अमित शिंदे, श्याम घोगरे, वाजिद पठाण, अयाझ शेख, मनोज मुदगल, राजकुमार पवार, अनिकेत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, असद पठाण, विशाल शिंगाडे, विवेक घोगरे, सतीश घोडराव, अविनाश तांबरे, विलास पडवळ, जयंत देशमुख, दशरथ माने, नितीन चव्हाण, बाळासाहेब खांडेकर, मझहर शेरीकर, बाबा मुजावर, मंजूषा खळदकर रवीना बिराजदार, रंजना भोजने, सुनिता जगदाळे, सौरभ देशमुख, रॉबिन बागडे, दत्तात्रय पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...