आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगग्रस्त पीक:सोयाबीन नुकसान भरपाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीनसाठी नुकसानभरपाई मिळावी यासाठी चे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आले. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मागील तीन महिन्यापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. परंतु पेरणी झाल्याबरोबर महिन्यातच पडलेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनची अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आज तारखेपर्यंत सरासरीच्या १५३टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्यातच नव्याने गोगलगायी च्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हजारो हेक्टरीवरील सोयाबीनचे पीक गोगलगायने उध्वस्त केले असे असताना उरलेले सोयाबीनला शेंगा व फुले लागल्याच्या अवस्थेत यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगामुळे उभे पीक पिवळे पडू लागले आहे हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतातील रोगग्रस्त पीक उपटून फेकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मसूद शेख, नितीन बागल, कादर खान, श्याम घोगरे, नानासाहेब जमदाडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष शेख आयाज, विशाल शिंगाडे, तुषार वाघमारे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...