आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार समारंभ:एनईईटी, जेईई गुणवंतांचा सत्कार; सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशपातळीवरील एनईईटी / जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या.

आयोजित कार्यक्रमात पाटील बोलताना म्हणाले की, शिक्षण महर्षी गुरुवर्य के. टी. पाटील यांनी उदात्त हेतूने मागासलेल्या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. वास्तविक त्यांना इतरत्र संस्था काढणे कठीण नव्हते, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पाच ते सहा विद्यार्थी नीट व जेईई परीक्षेत यशस्वी झाले. यावर्षी २० विद्यार्थी एनईईटी / जेईई परीक्षेत यश मिळू शकले. हे यश मिळवण्यासाठी देशातील नामांकित संस्था आकाश ॲलन मोदी इन्स्टिट्यूट या ठिकाणी भेटीगाठी देऊन तेथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांना आमंत्रित केले. तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या.

त्यामुळे येथील सर्वसामान्य विद्यार्थी पालकांची लातूर, पुणे, मुंबई येथील शिक्षणाची होणारी परखड थांबली. फोटोन क्लास गुणवंत व होतकरू मुलांसाठी निर्माण केला. या वर्गाचे क्लास सकाळी ७:३० ते ४:०० पर्यंत चालत व सायंकाळी ६:०० ते ९:०० वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी डाऊट सेशनचे वर्ग सुरू केले. केवळ १२ नव्हे तर पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स याच महिन्यात एप्रिल २०२२ मध्ये तज्ञ अनुभवी व प्रतिभावंत संस्थेतील शिक्षकांची नेमणूक केल्याचे सांगितले. यावेळी अमर उंबरे, अंकिता कुंभार, प्रतिभा यादव, दिशा घारगे, प्रतिक्षा लोमटे, पौर्णिमा निर्मळे, आदित्य काकडे, श्रावणी सातपुते, मधुमती सदाफुले, तुषार उंबरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य एस. एस. देशमुख, उपप्राचार्य एस. के. घारगे, फोटोन विभाग प्रमुख ए. व्ही. भगत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला वाणिज्य विभाग प्रमुख एन. आर. नन्नवरे तर आभार भगत यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...