आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे कसे काय?:रिकामे नदीपात्र व प्रशासकीय जागेतील वाळू साठ्याकडे दुर्लक्ष; बांधकामाच्या ठिकाणच्या वाळूचे पंचनामे करून नोटीसा बजावल्या

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फक्राबाद येथे महसूलच्या पथकाने (मंगळवारी (दि.३१) कारवाई करून चालू बांधकामाच्या ठिकाणच्या ४८ ब्रास वाळूचे पंचनामे करून सदरील नागरिकांना नोटिसा बजवाल्या आहेत.

मंगळवारी वरिष्ठ महसूल विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वाशी महसूल च्या पथकाने फक्राबाद येथे बांधकाम सुरु असलेल्या आठ ठिकाणी कारवाई करत ४८ ब्रास वाळूचे पंचनामे करून संबंधित आठ नागरिकांना वाळू बाबत नोटीस बजावल्या आहेत. तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी आलेल्या या पथकाने याच भागात असलेल्या अनेक ठिकाणच्या अवैध उपसा करून साठा केलेल्या ठिकाणी कारवाई केली नाही त्यांना अभय का दिले असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. त्याच बरोबर तालुक्यात येणाऱ्या या भागातील मांजरा नदीपात्रामध्ये लाखणगाव ते पिंपळगाव (को) पर्यंत वाळू चोरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या भागातील नदी पात्रामध्ये बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे. यासाठी जेसीबी मशीनचा रात्रभर वापर करण्यात येऊन वाळू साठे हुडकून त्यातील वाळू पात्राच्या बाहेर वाहतूक करून त्याच साठा करण्यात येतो. यादरम्यान पात्रामध्ये झालेले खड्डे हे मशीनच्या सहाय्याने बुजविण्यात येतात.

यामध्ये प्रामुख्याने लाखणगाव,फक्राबाद,पारा-नांदूर मधील रस्त्यावरील नदीपात्र,पिंपळगाव (को) या भागातील नदीपात्रात जास्त प्रमाणात चोरून वाळू उपसा होत आहे. तरीही वाशी महसूल विभाग कारवाई करताना दिसून येत नाही. या उलट करण्यात आलेल्या कारवाईमधील बहुतांश वाहने ही नदीच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे बीड जिह्यातून वाळू भरून आलेली असतात. वाशी महसूल चा गलथान कारभार एवढयावरच न थांबता पारा गावाजवळ प्रशासकीय जागेच्या परिसरामध्ये असलेल्या वाळू साठ्यावर कारवाई करण्यात येत नाही याचेही गौडबंगाल अद्याप कळण्यास तयार नाही. यामुळे तक्रार केली तर चोर सोडून घरे बंधनाऱ्यावरच करणार का ? नदीपात्र रिकामे झाले ते कोणाच्या मर्जीने कि दुर्लक्षाने?असे उलट प्रश्न नागरिकांमधून आतापासूनच विचारले जात आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी झाली होती डोके फोडाफोडी
नदीपात्रातून चोरून वाळू उपसा करताना संबंधित तस्करांकडून शेतकऱ्याच्या शेतातून वाहने घालून रस्ता करण्यात येतो. यासाठी जे ऐकतील त्या शेतकऱ्यांना रस्त्यापोटी काही पैसे दिले जातात अथवा कोणत्याही कल्पनेशिवाय रातोरात वाहने रस्ता करून बाहेर काढली जातात.अशाच प्रकारे रस्त्यासाठी ठरलेली मागील वर्षीची रक्कम ही दिली नाही आणि आता आणखीन वाहन घालणाऱ्याला जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात सदरील वाहन धारकाने दगड मारून जखमी केल्याची घटना घडली. होती. या बाबत गावातील नागरिक व काही लोकप्रतिनिधी याची मध्यस्थी करून ते प्रकरण पोलिसात जाऊ दिले नाही. मात्र वाळू तस्करांची मुजोरी नेमकी कशामुळे वाढत आहे? या प्रशासन चिरी मिरी पोटी मिंधे आहे की आणखीन काही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...