आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुलभ मोबाईल अॅप:ई पीक पाहणी प्रकल्पासाठी नवीन अॅप

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून आणि स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये बदल करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपे आणि सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन २ विकसित केले आहेत. १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचा अक्षांश आणि रेखांश समाविष्ट केले आहेत. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावली मध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटांपासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्येच दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळेच पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे. ई-पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या पिकांबाबत आज्ञावली मध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केलेली ई - पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी दहा टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...