आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठवड्यात दुसऱ्यांदा आढळला नवा रुग्ण; कोरोनाचा पुन्हा प्रवेश, संसर्ग रोखण्यासाठी दक्षतेची जबाबदारी आपल्यावर

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात दीड ते दोन महिने कोरोनाचे रुग्ण निरंक होते. मात्र, पुन्हा दबक्या पावलांनी कोरोना येत आहे. आठ दिवसांत चार रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनासह नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७४ हजार १६८ नागरिक बाधित झाले असून ७२ हजार ४७ नागरिक बरे झाले आहेत. गुरुवारी (दि.२) एक नवीन रुग्ण आढळला असून तीन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर दोन रुग्ण उपचाराखाली आहेत.

कोरोना संपलेला नसून पुन्हा दबक्या पावसाने येत आहे. जिल्ह्यात आठवड्यात चार रुग्ण आढळले असून २७ मे रोजी तीन तर २ जून रोजी उस्मानाबाद शहरात एक रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या तिनही लाटेत जिल्ह्यातील १५३८ नागरिकांचा बळी गेलेला आहे. मात्र, लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत मृत्यू दर अत्यंत कमी होता. मार्च व एप्रिल महिन्यात शून्य रुग्ण आढळले. मात्र, मे अखेरला जिल्ह्यात पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून २ जून रोजी एक नवा रुग्ण आढळला आहे. यामुळे पुन्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही.

संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत: जबाबदारी स्विकारुन कोरोनाच्या निकषाचे पालन करण्याची गरज आहे. दुर्लक्ष केल्यास आगामी काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे नियम शिथील झाले आहेत. असे असले तरी नियमाचे पालन झाल्यास कोरोनाचे रुग्ण कायम शून्य असतील. गेल्या दोन महिनाभरात एकही रुग्ण आढळला नव्हता. अनेक दिवसांनंतर शून्याच्या जागी आकडा येत आहे. आकडा रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत: जबाबदारी स्विकारुन कोरोनाचे निकष पाळण्याची गरज आहे.

लसीकरणाचा प्रतिसाद घटला
तिसऱ्या लाटेत फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे सध्या लसीकरणाला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. नागरिकांनी लस घेण्याची गरज आहे. काही दिवसांत रुग्णसंख्या वाढल्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या व तिसऱ्या लाटेतील बहुतांश नागरिकांनी लस घेतली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव जाणवला नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी होते.

लसीकरण वेगाने वाढवणार
पहिला डोस तर ८४ टक्के नागरिकांनी घेतला आहे. परंतु, दुसरा डोस केवळ ६२ टक्के लोकांनीच घेतला असून उर्वरीत लोकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन केले आहे. नागरिकांनी कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा.
-डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण मोहीम अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...