आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या ढोकी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ओबीसीसह नव्याने आरक्षण काढण्यात आले.त्यानुसार आता नव्या रचनेमुळे एकूण सतरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी चार जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वात मोठी राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ढोकी ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून ग्रामपंचायतीसाठी सहा प्रभाग असून सतरा सदस्य निवडून द्यायचे आहेत. आक्टोबर २०२२ मध्ये विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपत आहे.ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पूर्वतयारी म्हणून प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी ढोकी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये सोमवारी चिट्ट्याद्वारे प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
या आरक्षणात ओबीसींचा (नागरिकांचा मागास प्रवर्ग) समावेश नव्हता.२० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसाठी आरक्षण मान्य केल्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण निश्चितीसाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.नव्या रचनेमुळे एकूण सतरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी चार ओबीसी प्रवर्गातून येतील. प्राधिकृत आधिकारी म्हणून उध्दव सांगळे यांनी काम पाहिले.
त्यांना ढोकी सज्जाचे तलाठी विलास डोके व ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार यांनी सहकार्य केले.यावेळी सरपंच नाना चव्हाण,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, शकील काझी,संग्राम देशमुख,सतिष देशमुख आदी उपस्थित होते.
आरक्षण पुढीलप्रमाणे असून यामध्ये अनुसुचित जातीसाठी ३ जागा व अनुसुचित जमातीसाठी २ जागा राखीव आहेत.यामध्ये अनुसुचित जातीतील महिलासाठी दोन वअनुसुचित जमातीतील महिलासाठी एक व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी चार व ओबीसी प्रवर्गातील महिलासाठी दोन अशा सतरा पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.