आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरबीआयने बाजारात आणलेल्या नव्या नोटांची नक्कल होत नसल्याचा दावाच खोटा ठरला असून जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट समोर आले आहे. याची लिंक कळंब शहरात असून एक तरुणास अटक करून त्याच्याकडून ५०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
एक व्यक्ती बनावट नोटा जवळ बाळगून तो व्यवहारामध्ये नोटा वापर करत आहे अशी खबर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांना शुक्रवारी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवली आणि तपास सुरू केला. मध्यरात्री दराडे, हवालदार शिवाजी राऊत, एस. एल. हांगे, अमोल जाधव, सुनील कोळेकर व रेखा काळे यांनी शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. तत्काळ पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यास त्याचे नाव व गाव विचारता त्याने त्याचे नाव असद ताहीर अली सय्यद (२४, रा. बाबानगर, कळंब) सागितले.
या व्यक्तीस विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या तीन नोटा व २०० रुपयांच्या बनावट पाच नोटा आढळल्या. त्याची चौकशी करून घराची झडती घेतली तेव्हा घरामध्ये कपाटाशेजारी भिंतीच्या फरताळामध्ये ५०० रुपयांच्या दोन बनावट नोटा सापडल्या. त्यामध्ये एका नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँक असे लिहिलेले असून जिचा क्र. ओबीबी ०५१६०७ व दुसऱ्या नोटावर भारतीय रिझर्व्ह बँक जिचा क्र. ८ एडी ६२७२२३ आढळून आला. याप्रकरणी असद ताहीर अली सय्यदविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.