आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे ग्रामपंचायत तर्फे सोमवार, दि. २० रोजी गावातील दोन्ही जिल्हा परिषद शाळा व जयहिंद विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कसबे तडवळे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सोमवार, दि. २० रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जून २०२२ दहावी वर्गातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी ,बारावी मधील प्रथम तीन विद्यार्थी व मागील वर्षातील १६ नवोदय प्रवेशपात्र विद्यार्थी तसेच ४२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असे एकूण ६४ विद्यार्थीचा सत्कार एस.पी.सुगर चे चेअरमन तथा उपसरपंच सुरेश साहेबराव पाटील व सरपंच मन्मथ आवटे, माजी उपसरपंच शहाजी वाघ ,तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील वळेकर, सोसायटीचे चेअरमन महेबुब कोरबू, श्रीमंत गावखरे, सुदर्शन करंजकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही यातून सकारात्मक प्रेरणा घेत सु़धारणा करावी कमी गुण असतानाही जिवनात यशस्वी होता येते हे स्वतः च्या अनुभवातून सांगितले.
या कार्यक्रमास जयहिंद विद्यालयाचे प्रा. सुहास गवळी, केंद्रीय मुख्याध्यापक केशव पवार, रहेमान सय्यद, हनुमंत पवार, संजय राठोड, ग्रां. प. सदस्य याकूब फकीर, दत्तात्रय कदम, भास्कर जमाले,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ धायगुडे,सूत्रसंचालन पंकज ठाकरे, शहाजी पुरी यांनी केले तर आभार बाळासाहेब जमाले यांनी मानले. यावेळी शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायत कार्यालयतर्फे फेटा बांधून सन्मानचिन्ह,पुस्तक,हार घालून यथोचित सन्मान करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देल्या.तसेच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी असून यातून पुढे अशीच यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांनी जे यश मिळविले आहे त्यामुळे कसबे तडवळे गावाचा ही नावलौकिक वाढतो आहे असे पाटील यांनी सांगितले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.