आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:ग्रामीण गुणवत्ता वाढीसाठी १४ वर्षांपासून रात्र अभ्यासिका वर्ग

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाकरिता २००८ पासून विद्यालयात रात्र-अभ्यास वर्ग भरवले जातात. याबाबत शनिवारी पालक मेळावा घेण्यात आला. मुख्याध्यापक जे. ए. मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपली मुले आपलेच अनुकरण करतात, त्यामुळे आचरण, विचार आदर्शवादी असावेत. घरातील वातावरणात पावित्र्य ठेवून मुलांच्या गरजा, इच्छा व आकांक्षा जरुर पुरवाव्यात पण फाजील लाड करू नये. मुलांना गाडी, मोबाइल, रोख पैसे दिल्यास वाईट वळणावर जाऊ शकतात.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वच शिक्षक अभ्यास घेत असून पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याध्यापक जे. ए. मोरे यांनी केले. याबाबत शनिवारी (दि.१०) पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्याध्यापक प्रास्ताविकात बोलत होते. ज्येष्ठ शिक्षक के. बी. माळी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जगदाळवाडी, थोरलीवाडी, धाकटीवाडी, तलमोड, तलमोड तांडा येथील पालकांची उपस्थिती होती. पालक मेळाव्यास शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र जाधव यांनी आभार मानले.

शालेय शिक्षणासह परीक्षेवर मंथन
पालक मेळाव्यात नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षात विद्यार्थी उपस्थिती, मासीक परीक्षा, गुणात्मक विकास, चाचणी अन् शालेय शिक्षण यादृष्टीने चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक माळी यांनी रात्र-अभ्यास वर्गाचे वेळापत्रक सांगून याबाबत विषय निहाय माहिती पालकांना दिली. यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त करून चर्चेत सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...