आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरांचे नामांतर:बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील, उद्धव ठाकरेंच्या ते नशीबात नाही; आमदार नितेश राणेंची खोचक टीका

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा नितेश राणे यांनी औरंगाबादल आणि उस्मानाबाद नामांतरवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील संकट असल्याची नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी सोमवारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कुटूंबियांसह तुळजापूरला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे नितेश राणे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हेच नागरिकांसाठी संकट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

उस्मानाबाद व औरंगाबादचे नामकरण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नशीबात नसून, देवेंद्र फडणवीस दोन्ही शहरांचे नामांतर करतील. असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सचिन पाटील यांच्या वतीने नितेश राणे यांचा सत्कार करण्यात देखील करण्यात आला.

औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका

“एमआयएमला खुश ठेवण्यासाठी आमच्या शेर राजाचे नाव शहराला द्यायला तयार नाहीत. जेव्हा भाजपा आणि शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा 2015-16 या साली सारे प्रस्ताव तयार करत आणले होते. आता शेवटचा प्रस्ताव मंत्रिमंडळासाठी आहे. पाच वर्षे काय केले असे आम्हाला विचारले जाते. पोस्ट ऑफिसपासून प्रत्येक विभागाची एनओसी घ्यावी लागते. या सर्व एनओसी आम्ही घेऊन टाकल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर या टर्ममध्ये आम्हाला नामांतर करायचे होते. आता कॅबिनेटचा प्रस्ताव विचारार्थ आहे. तुम्ही जर खरेच एमआयएमच्या विरोधात असाल तर संभाजीनगरचा प्रस्ताव करा, या अधिवेशनात मी हा विषय पुन्हा मांडणार आहे.” असे मुनगंटीवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता!

'संभाजीनगर करण्याची सिंहगर्जना करणारे कुठे गेले. 1988 मध्ये बाळासाहेबांनी सांगितलेलं की, हे माझे वचन आहे. कुठे गेले ते वचन? शरजील उस्मानी येतो हिंदू हे सडकी लोकं आहेत असे म्हणतो कुठे गेले हे सगळे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात अतिशय नीच शब्दांचा उपयोग होतो जो सामान्य कोणीही बुद्धीवादी व्यक्ती वापरणार नाही त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता.

बातम्या आणखी आहेत...