आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार:कंपनीची नियुक्ती नाही; गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला पुन्हा खंड

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपीनाथ मूंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी राज्य शासनाने विमा कंपनीच नियुक्त न केल्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही योजनेला खंड पडला आहे. दोन महिन्यांपूर्वीच मुदत संपली असताना अद्यापही शासनाकडून विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली नाही. यामुळे आता प्रस्ताव स्वीकारणे बंद झाले असून जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या चार महिन्याच्या कालावधीतील १७ प्रस्तावांची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.

रात्रं - दिवस कोणत्याही सुरक्षेशिवाय राबवणाऱ्या शेतकऱ्यांचे मृत्यूचे होण्याचे प्रमाण अधिक आहे. विविध अपघातांपासून ते विषारी प्राण्यांच्या दंशामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतात. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. अशा कुटुंबांना तसेच अपघातात जायबंदी झालेल्या शेतकऱ्यांनाही पुढील आयुष्य जगण्यासाठी आधाराची गरज होती. यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये अपघाती मृत्यू झाला तर वारसांना दोन लाख, अर्ध अपंगत्व आलेल्या उर्वरित पान ४

गतवर्षीच्या प्रस्तावांची रक्कम नाही
गतवर्षी खंडित कालावधीत मृत शेतकऱ्यांचा वारसांना विमा कंपनी ऐवजी सरकारनेच भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. असे ६८ पस्ताव पाठवण्यात आले आहेत. यापैकी ५१ प्रस्तावांचे १ कोटी १ लाख वितरीत झाले आहेत. यापैकी १७ प्रस्तावांची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

तीन वर्षांत १८८ प्रस्ताव नामंजूर
गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल १८८प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण मंचामध्येही अनेक प्रकरणे दाखल आहेत. बहुतांश शेतकरी कुटुंब खर्च करण्यासाठी पैसा व वेळ नसल्यामुळे ग्राहक मंचात जात नाहीत. प्रकरण नामंजूर झाल्यानंतर नशीबाला दोष देत विषय सोडून देतात.

कंपनीची किचकट प्रक्रिया
विमा मंजूर करण्यासाठी कंपनीकडून किचकट प्रक्रिया राबवण्यात येत असते. गतवर्षी ७ एप्रिलपासून १८१ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यापैकी ९७ प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आले होते. यापैकी केवळ ५१ प्रस्तावांचे पैसे मिळाले आहेत. ४६ प्रस्ताव प्रलंबित असून ८४ प्रस्ताव कागदपत्रांअभावी कंपनीकडे अद्यापही पाठवण्यात आलेले नाहीत.

शेतकऱ्यांना योजनेचा मोठा आधार
शेतकऱ्यांना योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. खंडित कालावधीसह चार वर्षात ४२७ जणांना लाभ
रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे, विजेचा धक्का, विज पडून मृत्यू अपघाती विषबाधेत मृत्यूत लाभ जनावराने हल्ला केल्यास किंवा दंगलीत होणारे मृत्यू, खुन किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास भरपाई. पूर्ण अपंगत्व किंवा मृत्यू झाल्या दोन लाखांची मदत, अर्धे अपंगत्व आल्यास मिळते मदत

शेतकऱ्यात निर्माण होईल रोष
खंडाच्या कालावधीतील प्रस्ताव कृषी विभागाकडून दाखल करून घेण्यात येत नाहीत. यामुळे प्रस्ताव दाखल करण्यासाठी शेतकरी कुटुंबीय सातत्याने कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.यामुळे रोष निर्माण होईल.

बातम्या आणखी आहेत...