आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गेले 15 वर्षांपासून डांबरीकरण नाही ; मुकेश कोमटवार यांना निवेदन सादर

कळंब14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बस स्थानकात उडणाऱ्या धुराळयामुळे प्रवाशासह दुकानदारही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बस स्थानकात डांबरीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांना देण्यात आले आहे. शहरातील बस स्थानकात गेल्या पंधरा वर्षापासून डांबरीकरण केले गेले नाही, या बस स्थानकात अनेक लहान-मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये रा .प .प्रशासन माती मिश्रित मुरूम टाकून खड्डे बुजवले जातात, या खड्ड्यात दगड माती असल्याने काही कालांतराने येणाऱ्या जाणाऱ्या बसमुळे त्याचे धुळीचे लोट उठतात तर काही वेळेस खड्ड्यातील दगड बसच्या चाकाखाली आल्याने अनेक प्रवाशांना हकनाक उडणाऱ्या दगडाचा मार खावा लागत आहे. या धुळीमुळे अनेक प्रकाशासह व्यपाऱ्यांना रोग उद्भवू शकतो त्याचप्रमाणे दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या मालावर धूळ साचली जाते, या मुळे रोगराई पसरण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.

आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. डांबरीकरण न केल्यास दिनांक २६ जानेवारी रोजी रा. प. प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर विलास मुळीक, अकिब पटेल, दत्तात्रय उमाप, एम. जे. लोकरे, बी.एच.चोरघडे, मुकीब पटेल, दिलीप चालक, सोमनाथ सुरवसे, करीम पठाण, अंकुर चालक, हरीश धमावत, प्रसाद करवलकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

बातम्या आणखी आहेत...