आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझ्याविना शिक्षण:मुलांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे म्हणण्याची येणार नाही वेळ; अभ्यासक्रम झाला आता सुटसुटीतकळंब

कळंब13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा म्हटले की दप्तर आलेच. मग त्यात किमान सात पुस्तके, सहा वह्या, असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र आता सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागांत विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. एक पुस्तकामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे.

काळानुसार शिक्षणात आमुलाग्र बदल होत चालला आहे. याचा फायदा आणि तोटा सुध्दा होत आहे. काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढतच चालले आहे. शासनाने विद्यार्थ्यांचा पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन करून २०१५ मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या; मात्र खरोखरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले का? याची पाहणी शासनाकडून शाळांमध्ये नियमितपणे झाली नाही. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत; परंतु अनेक पालक याबाबत जागरूक नसल्याने विद्यार्थ्यांचे दप्तर जड होत चालले आहे. ओझ्याविना शिक्षण

दप्तराच्या ओझ्याचे दुष्परिणाम प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे यासह अनेक आजार-विकार निर्माण होत आहेत. ‘ओझ्याविना शिक्षण’ या संकल्पनेतून शासनाने काही ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, त्याची अंमलबजावणी या वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या बद्दल सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे. दप्तराच्या ओझ्यावरची टीका आता कमी होण्याची शक्यता आहे.

मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमाची नव्याने मांडणी करत राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत घेऊन जावी लागत होती. या वर्षी एकाच पुस्तकात संपूर्ण अभ्यासक्रम देण्यात आला असून याची तीन भागांत विभागणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध झाले आहेत.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाय
द्विभाषिक पुस्तकात मराठी शब्दाला पर्यायी कंसात इंग्रजी शब्द देण्यात आले आहेत. तसेच ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असणार आहेत.सर्व विषयांसाठी एकच पुस्तक असून वर्षात त्यांचे इयत्ता पहिली साठी चार भागात व इयत्ता दुसरी ते सातवी तीन भागात असणार आहे.यामुळे दप्तरांचे ओझे कमी होणार आहे. सध्याच्या मुलांना शाळेत जाताना अनेक वर्षापासूनच्या समस्येवर हा उपाय आहे. मधुकर तोडकर, गटशिक्षणाधिकारी, कळंब

बातम्या आणखी आहेत...