आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विहीर अधिग्रहण मावेजा मिळेना; शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

लोहारा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात गावांची तहान भागवण्यासाठी अधिग्रहण केलेल्या विंधन विहिरीचा मागील तीन वर्षांपासून मावेजा मिळाला नाही. हा मावेजा तत्काळ देण्याची मागणी जेवळी येथील शेतकरी बसवराज होणाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली. तसेच आत्मदहनाचा इशाराही दिला.निवेदनात म्हटले की, तालुक्यातील जेवळी (दक्षिण) गावाजवळ माझी शेतजमीन आहे. १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले. यानंतर नवीन जेवळी गाव तयार झाले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक उन्हाळ्यात या गावात पाणीटंचाई असते. मी पाच वर्षांपूर्वी पाण्याची सोय व्हावी म्हणून माझ्या शेतातून घरापर्यंत पाइपलाइन करून पाणी आणले.

ग्रामपंचायतने माझ्या घरापासून पाचशे मीटरवरील पाण्याच्या टाकीला ही पाइपलाइन जोडली आहे. मागील तीन वर्षांपासून माझी विंधन विहीर अधिग्रहण केली जात आहे. २०१९-२० मध्ये ५० टक्के मावेजा मिळाला. उर्वरित अद्याप मिळाला नाही. त्यानंतर प्रत्येक वर्षी अधिग्रहण करण्यात येते. मात्र, त्याचा मावेजा दिला जात नाही.

यासंदर्भात ग्रामपंचायत व गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करून चौकशी केली. बजेट नाही असे सांगण्यात येते. आम्ही तक्रार तरी किती वेळा करायची? यासंदर्भात उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना सांगितले असता त्यांनी चौकशी केली. तेव्हा समाधानासाठी १३२०० रुपयांचा मावेजा खात्यावर जमा करण्यात आला. त्यामुळे पुढील एक महिन्याच्या आत संपूर्ण मावेजा जमा झाला नाही तर उपोषण किंवा आत्मदहनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...