आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण महाराष्ट्राच्या समस्यांविषयी अज्ञानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेपर्वाईमुळेच राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या गाळपाची समस्या गंभीर बनली असून बीडमधील शेतकऱ्याने ऐन उमेदीत गळफास घेत आत्महत्या केली. हे सरकारच्या निष्क्रियतेचे पाप आहे, असा आरोप भाजपचे नितीन काळे यांनी केला आहे. ऊस उत्पादन असेच वाढत राहिले तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच दिला होता. सरकारने त्यानंतर तरी ऊस गाळपाचे काटेकोर नियोजन करायला हवे होते. मराठवाड्यातील शिल्लक ऊसाचा अंदाज घेत तोडणीचे नियोजन करायला हवे होते. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून राज्यातील सुमारे ७० लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. गाळप न झालेल्या ऊसाची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याच्या भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सरकार शेतकऱ्याच्या हलाखीची गंमत बघत आहे. अलीकडेच भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचे या समस्येकडे लक्ष वैधण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचलाच नाही. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुंबई केंद्रीत माध्यमांनी आता बातम्यांचे प्राधान्यक्रम बदलून ग्रामीण महाराष्ट्राचा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही काळे यांनी केले. अन्यथा ग्रामीण भागातील शेतकरी मुंबईवर चाल करून मंत्रालयासमोर त्यांच्या समस्या मांडतील. वेळेत तोडणी होऊन कारखान्याने ऊस उचलला नाही म्हणून शेतात करपणाऱ्या उसाला आग लावून नामदेव जाधव या ३२ वर्षांच्या शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारकिर्दीचा हा बळी आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नितीन काळे यांनी गृह खात्याकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.