आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सुखावला:मोर्चाची दखल, भैरवनाथ शुगरकडून 2200 रुपयांची पहिली उचल जाहीर

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्सच्या ऊस दराविरोधात शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतकरी मोर्चाची दखल घेत भैरवनाथने २०२१-२२ हंगामासाठी प्रति टन ४०० रुपयांप्रमाणे दोन टप्प्यात हप्ता देणार असून २०२२-२३ हंगामासाठी प्रति टन २२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.

भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी व भैरवनाथ शुगर वर्क्स वाशी या युनिटने मागील हंगामातील (२०२१-२२) शासन निर्णयानुसार निव्वळ एफआरपी २००० रुपये टनाप्रमाणे संपूर्ण ऊस बिल ऊस पुरवठादारांना देण्यात आले. बाणगंगा कारखान्याने २४५१ दर दिल्याने शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑक्टोबरला शेतकरी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले होते. भैरवनाथने इतर कारखान्यांप्रमाणे दर द्यावा व चालु गळीत हंगामाचा दर जाहीर करा अन्यथा कारखाना बंद पाडण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत भैरवनाथ शुगरने उर्वरीत ४०० रुपये दोन टप्प्यात तर चालु गळीत हंगामाची पहिली उचल २२०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार व चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांनी गाळप हंगाम २२-२३ च्या शुभारंभाचा कार्यक्रमात जाहीर केला. त्याप्रमाणे सोनारी युनिटसाठी मागील हंगामातील ऊसाला एफआरपी पेक्षा प्रति टन ४०० रुपये हप्ता देण्याचे ठरले. ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाणार असून पुढील आठवड्यात २०० रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून उर्वरित २०० रुपयांच्या हप्ता गुढीपाडव्याला दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...