आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:इच्छुकांची संख्या वाढली, रात्री उशिरापर्यंत स्वीकारले अर्ज

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात २३ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने सायंकाळी साडेपाचपर्यंत निवडणूक कार्यालयात उपस्थित इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. निवडणूक विभागाकडे गुरुवारपर्यंत (दि.१) बारा गावातून सरपंच पदासाठी १७ तर सदस्यपदासाठी ६७ अर्ज दाखल झाले होते. तसेच शुक्रवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाले होते. ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन प्रक्रिया, स्वंयघोषणापत्र, शपथपत्र दाखल करण्यासाठी इच्छुक पुरुष, स्त्री उमेदवारांचा अख्खा दिवस शहरात गेला.

दुपारी तीनपर्यंत २३ गावातून सरपंचपदासाठी जवळपास ३५ अर्ज दाखल होते. त्यानंतर सायंकाळपर्यंत प्राप्त झाले असलेल्या अर्जाची अधिकृत माहिती संकलित करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. एकुण २३३ सदस्यपदासाठी दुपारी तीनपर्यंत साधारणतः दोनशेहून अधिक अर्ज दाखल होते, त्यापेक्षा अधिक प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी व स्वीकारण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

तहसीलदार प्रसाद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शिवाजी कदम, रतन काजळे, निवडणूक विभागाचे मुख्य लिपिक विनोद स्वामी यांच्यासह ग्रामपंचायतनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी या प्रक्रियेत सक्रिय काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...