आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकांमधील वाढती व्यसनाधिनता हा देशातील चिंतेचा विषय बनलेला आहे. व्यसनाधीनतेच्या विळख्यातून युवा पिढीला रोखण्यासाठी अमली पदार्थ दुष्परिणाम जनजागृती कार्यक्रम जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमली पदार्थ दुष्परिणाम जनजागृती शपथ अधिकारी,कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके, महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी बळीराम निपाणीकर, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जनजागृतीचे विचार मांडण्यात आले.
देशात २.१ टक्के लोकसंख्या अमली पदार्थांच्या आहारी
व्यसनाधीनता अनेक प्रकारची असते पण ती अनेक प्रकारे मानवी जीवनाला घातक आहे. याबाबत सरकारी पातळीवर अनेक वर्षांपासून जनजागृती चालू आहे. यामध्ये स्वयंसोवी संस्थांसह, मिडीयाचाही मोठा सहभाग आहे. एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशातील २.१ टक्का लोकसंख्या ही अंमली पदार्थासह इतर पदार्थांच्या व्यसनात आहे. गांजा, हेरॉइन, अफू यासह काही मादक औषधांचा यात समावेश आहे. प्रौढांसह लहान मुले आणि स्त्रियांचाही यात समावेश आहे. जागतिक तंबाकू सेवन संस्थेने केलेल्या पाहणीनुसार भारतात २६ कोटींवर लोक धूम्रपान करतात. यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची मोठी शक्यता आहे. यामध्ये गुटख्याचा प्रभावही मोठा असल्याने यावर आता बंदी आहे. मद्य प्राशन करणारांची देशातील संख्या १९ टक्के असून शहरापेक्षा ग्रामीण भागात मद्य प्राशन करणारे जास्त आहेत. यात दीड टक्के महिलांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.