आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:शासकीय कामात अडथळा करत शिवीगाळ, धक्काबुक्की, गुन्हा दाखल

उमरगा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मातोळा येथील तक्रारी अर्जानुसार पाणंद रस्त्याची स्थळपाहणी करून पंचनामा करताना दोघांनी शासकीय कामात अडथळा करत शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मातोळा येथील मोहन मारुती भोसले, अंकुश किसनराव भोसले व मुकेश व्यंकट भोसले यांनी पाणंद रस्ता, वहिवाट संदर्भाने तहसील कार्यालयास संयुक्त तक्रार दिली होती. तहसीलदारांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता नायब तहसीलदार एस. एस. थोटे, मंडळ अधिकारी दीपक चव्हाण व तक्रारदार, गावातील सतीश त्र्यंबक भोसले, दयानंद सदाशिव भोसले व शेतकरी थांबले होते.

स्थळपाहणी करून विलास माणिक गिरी, माधव धर्मा गायकवाड या पंचासमक्ष पाणंद रस्ता पाहणी करून पंचनामा सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास सतीश व दयानंद अचानक जवळ आले. सतीशने तक्रारदाराची मान पकडून शर्ट फाडला. हा पाणंद रस्ता नाही, येथे पंचनामा करायचा नाही असे म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. नायब तहसीलदार थोटे, मंडळ अधिकारी चव्हाण समजावून सांगत असताना त्या दोघांनी त्यांनाही शिवीगाळ केली. पंचनामा व कागदपत्रे हिसकावून घेतले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला, शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याची फिर्याद मंडळ अधिकारी प्रवीण गंगाराम कोकणे यांनी गुरूवारी रात्री सव्वा ऊ वाजता दिली. त्यानुसार सतीश त्र्यंबक भोसले, दयानंद सदाशिव भोसले यांच्याविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...