आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरंडा तालुक्यातील पवारनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला जातो.यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५००० विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप या संस्थेच्या मार्फत करण्यात येत आहे.
परंडा तालुक्यातील एकूण १७ शाळेत अशा संपूर्ण जिल्हाभरातील विविध शाळांतील ११४० विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप करण्यात येत आहे.पवार नगर शाळेचे शिक्षक विनोद सुरवसे यांनी सेवा सहयोग संस्थेच्या मुख्य व्यवस्थापिका दीपाली देवळे ,विशाल देसाई ,राम रोकडे यांच्याकडे सदर मुख्याध्यापकांच्या मार्फत मागणी केली होती. सेवा सहयोग संस्थेच्या दीपाली देवळे यांनी यावेळी शाळांतील ११४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी स्कूल किट्स विनोद सुरवसे, अमोल अंधारे बाळासाहेब घोगरे, धनराज बनसुडे यांच्याकडे सुपूर्द केली. शुक्रवारी (दि.१७) या स्कूल किटचे वाटप पवारनगर शाळेमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे अनाळा बीटचे विस्ताराधिकारी योगेन्द्र खराडे,तांदुळवाडी बीटचे विस्तार अधिकारी दत्तात्रय निर्मळे ,महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-अनाळा चे मॅनेजर विनय सावंत.केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे ,धोंडीराम कांबळे ,प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ सावंत, शिक्षक समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते किट सुपूर्द करण्यात आले. या स्कूल किटमध्ये नवीन दप्तर,७वह्या, पाटी-पेन्सिल,१ चित्रकला वही,१ रंग पेटी कंपास पेटी , ८ रजिस्टर,ग्राफ रजिस्टर अशा असे शैक्षणिक साहित्य पात्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे.पवारनगर शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप टाक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास सातपुते आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.