आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:राज्याचे माजी लोकायुक्त न्या. गायकवाड यांना उस्मानाबाद भूषण पुरस्कार, पालकमंत्र्यांच्या होणार हस्ते पुरस्कारांचे वितरण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.१५) सकाळी १० वाजता नगर परिषदेत उस्मानाबाद भूषण पुरस्कार आणि कार्यगौरव पुरस्कार (२०२०) वितरण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारभांस उस्मानाबादकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी केले आहे.

उस्मानाबाद नगर परिषदेची स्थाना २५ मे १९५८ रोजी झाली असून, प्रत्येकवर्षी २५ मे रोजी वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींना उस्मानाबाद भूषण पुरस्कार व उस्मानाबाद शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात यावेत, असा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र कोरोना कालावधीत असा समारंभ घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे नगर परिषदेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर आमदार कैलास घाडगे पाटील,नगराध्यक्ष मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोविड नियमांचे पालन करूनच कार्यक्रम होणार असून, उस्मानाबादकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी केले आहे.

माजी न्यायमुर्ती गायकवाड यांना उस्मानाबाद भूषण पुरस्कार
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, राज्याचे माजी लोकायुक्त पुरूषोत्तम गायकवाड यांना २०२० या वर्षाचा उस्मानाबाद भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते न्या. गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे. न्या. गायकवाड हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावचे सुपूत्र आहेत. त्यांनी उत्कृष्ठ कार्य करून उस्मानाबादचा लौकिक वाढविला आहे.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कार्यगौरव
क्रीडा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, संगीत, साहित्य, कला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना नगर परिषदेच्या वतीने कार्य गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त डॉ.चंद्रजीत जाधव, सारिका काळे, क्रिकेट परीक्षक राम हिरापुरे, कोरोना काळात परिस्थिती चोखपणे सांभाळणारे डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. सचिन देशमुख, डॉ. प्रवीण डुमणे, डॉ. विशाल वडगांवकर, डॉ. सुश्रुत डंबळ, डॉ. शकील अहमद खान, डॉ. अनुराधा लोखंडे, उस्मानाबादेत स्वखर्चाने लाखमोलाची वृक्षसंपदा उभारणारे संजय प्रकाश निंबाळकर, शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे सुधीर केशव पाटील,नगर परिषद शाळेचे शिक्षक लहु लोमटे, सुरेश गायकवाड, कला क्षेत्रात उस्मानाबादला ओळख निर्माण करून देणारी दिपाली नायगांवकर तसेच कोरेाना काळात उत्कष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार, कार्यालय अधीक्षक संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक सुनिल कांबळे, विलास गोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच तत्पर रूग्णसेवा दिल्याबद्दल जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी सुमन बासु जावदकर, वहिदा शेख,उषा दाणे, संध्या निकम,सुरेखा जाधव,निलेश पाचभाई यांना व साहित्य, संगीत क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल युवराज नळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...