आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा; तत्कालीन तहसीलदारांवर बेहिशेबी मालमत्तेसंबंधी कारवाई

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब येथील तत्कालीन तहसीलदार वैशाली नेमगोंडा यांनी २२ लाख ४ हजार ३३७ रुपये बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई (एसीबी) केली आहे. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे करत आहेत.

वैशाली नेमगोंडा या कळंब येथील तहसीलदार पदावर कार्यरत असताना बेहिशेबी मालमत्तेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. चौकशीत २००८ ते ३० जून २०१६ दरम्यान त्यांनी त्यांना सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळालेल्या उत्पन्नापेक्षा २२ लाख ४ हजार ३३७ रुपये बेहिशेबी मालमत्ता संपादित करून गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचे उघड झाले होते.

उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उस्मानाबाद एसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे करत आहेत. सदर कारवाई औरंगाबाद एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद एसीबीचे पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते यांनी केली. कोणी लाचेची मागणी केल्यास एसीबीच्या मोबाइल अॅप्सद्वारे, www.acbmaharashtra.net या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...