आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्राध्यापकांच्या विरोधात गुरुवारी ( दि.२३) वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी शहरातील शिवसैनिकांनी पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांना निवेदन दिले होते. ज्यामध्ये येथील महाविद्यालयात प्राध्यापक आसलेल्या शहाजी उत्तमराव चेडे यांनी सोशल मीडिया वरील व्हॉटसॲप ग्रुप वर गुरूवारी ( दि.२३)महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बदनामी करणारा आणि मुख्यमंत्री पदाचा अपमान करणारा फोटो टाकून त्यांची बदनामी केली आहे. एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीकडून असे कृत्य शोभनिय नाही. ते जाणून बुजून राजकीय हेतूने टाकले गेले आहे. ज्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा वृत्ती च्या प्राध्यापक विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील दिला होता. त्यानुसार प्राध्यापक चेडे विरोधात वाशी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विकास मोळवणे, तालुका संघटक तथा नगरसेवक शिवहार स्वामी, कृष्णा गवारे, नानासाहेब कवडे, अरुण नलवडे, लायक तांबोळी, तात्यासाहेब गायकवाड, कृष्णा शेरकर, पंकज नाईकवाडी व इतरांच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.