आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणित सुधार उपक्रम अंतर्गत अध्ययन संस्था मुंबई आणि प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि २) जिल्हा परिषद प्रशालेत गणित सुधार उपक्रम अंतर्गत गणित विषयातील विभाज्यता या घटकाचे ऑलिंपिक घेण्यात आले. मुंबई अध्ययन संस्था व जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाचे वतीने घेण्यात आलेल्या गणित विषयातील विभाज्यता या घटकाचे ऑलिंपिक मध्ये यशस्वी शाळांना मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांचे हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मुलांची फ्री टेस्ट घेतली जाते, त्यानंतर शिक्षकांना ट्रेनिंग दिले जाते, ट्रेनिंग सोबतच शिक्षकांना अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी लागणारे साहित्य व विद्यार्थ्यांसाठी कृतिपुस्तिका हे सुद्धा अध्ययन संस्थेतर्फे सर्व शिक्षकांना देण्यात आले होते.
हेच शिक्षक आपापल्या शाळेत ट्रेनिंग घेतल्याप्रमाणे अध्ययन करतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांमध्ये किती फरक पडलेला आहे हे पाहण्यासाठी एक महिन्यानंतर पोस्ट टेस्ट घेतली जाते. त्या पोस्टमध्ये सर्वात जास्त गुण मिळविलेल्या प्रत्येक शाळेतून दहा-दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील निवड झालेल्या तालुक्यातील २० शाळेतील दोनशे मुलांची जिल्हा परिषद प्रशालेत ऑलम्पिक घेण्यात आली.
या ऑलिम्पिकमध्ये जिल्हा परिषद शाळा कोराळ येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागराळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळीच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. बक्षीस वितरणाप्रसंगी मुख्याध्यापक मोरे यांनी अध्ययन संस्थेच्या कामाचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.