आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये धमकी:उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी  सचिन ओम्बासे यांना संपवून टाकू

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आलेय. निवडणुकीतील वादातून हा प्रकार घडलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालाय. त्यात तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्द गावात निवडणुकीची चुरस वाढलीय. त्यातूनच हा प्रकार घडलाय.

घरावर चिटकावले पत्र

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रंगत आलीय. त्यात तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्द गावात जोरदार प्रचार सुरूय. या निवडणुकीत जोरदार कुरघोड्या सुरूयत. त्यात राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे आणि त्यांच्या आई कांताबाई साळवे यांना धमकीचे पत्र आलंय. हे पत्र त्यांच्या घरावर चिटकवण्यात आलंय. निवडणुकीतून माघार घे पाठिंबा दे, नाही तर अवघड होईल, असा इशारा पत्रातून दिलाय.

का दिली धमकी?

तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्दमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून रामेश्वर वैद्य हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडले गेलेत. विशेष म्हणजे 11 पैकी 7 जागाही बिनविरोध निवडल्यात. आता उर्वरित 4 जागांसाठी 2 पॅनल रिंगणातयत. त्यासाठी 2800 शे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातल्या एका जागेवर ज्ञानेश्वर साळवे या रिंगणात आहेत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी ही धमकी देण्यात आलीय.

धमकीचे पत्र.
धमकीचे पत्र.

नेमकी धमकी काय?

ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. शेवट पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा शाजदार ओम बाळ, तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू. हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरलापण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय? अशी धमकी या पत्रातून दिलीय.

का संबोधले 'बाळ'?

एका वहीच्या पानावर लिहून ही धमकी देण्यात आलीय. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख ओमराजे बाळ असा केलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर आणि राणा रणजित सिंह पाटील यांच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी झाली होती. यावेळी पाटील यांनी ओमराजे यांचा उल्लेख 'बाळ' असा केला होता. नेमके तोच शब्द इथे वापरण्यात आलाय.

बातम्या आणखी आहेत...