आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​नवरात्रोत्सव:पहिल्या मंगळवारी हजारो भाविक तुळजाईचरणी, भक्तांकडून मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट

तुळजापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सवातील दुसऱ्या माळेला मंगळवारचा योग साधत तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत दिवसभरात हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी माथा टेकला.

सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रातील दुसऱ्या माळेला शहरातील व्यावसायिक अनिल अग्रवाल यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नवरात्राेत्सवातील पहिला मंगळवार व दुसऱ्या माळेच्या अभिषेक पूजेनंतर सकाळी नऊच्या सुमारास तुळजाभवानी मातेची नित्योपचार अलंकार पूजा मांडण्यात आली. यावेळी धूपारतीनंतर अंगारा काढण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा संभळाच्या कडकडाट आणि ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती छबिना वाहनात ठेवून प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.