आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे‎ आयोजन:काक्रंबा येथे शिवजयंती निमित्त भव्य टेनिस‎ बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू, मान्यवर उपस्थित‎

काक्रंबा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा‎ येथील सहारा क्रिकेट टीमच्या वतीने‎ शिवजन्मोत्सव २०२३ निमित्ताने‎ गावात भव्य टेनिस बॉल क्रिकेट‎ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या‎ असून या क्रिकेट स्पर्धेला मंगळवार‎ दि ३१ रोजी मोठ्या उत्साहात‎ सुरुवात करण्यात आली आहे.‎ काक्रंबा येथील सहारा क्रिकेट‎ टीमच्या वतीने यंदा प्रथमच‎ शिवजयंती निमित्त गावामध्ये भव्य‎ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे‎ आयोजन करण्यात आले आहे‎ यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या‎ संघाला मान्यवराकडून मोठ्या‎ प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली‎ आहेत स्पर्धेचे मंगळवार दि ३१ रोजी‎ उद्घाटन करुन स्पर्धेला सुरुवात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आली.

यावेळी माजी‎ जि.प.सदस्य बालाजी बंडगर,‎ अशोक कंदले यांच्या हस्ते नारळ‎ वाढवून सुरवात करण्यात आली.‎ यावेळी अतुल कोकरे,करीम‎ अन्सारी, चेतन बंडगर,मोहन‎ हांडे,सदाम मुलांनी,सुरेश‎ भिसे,सचिन खताळ,शाहिद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अन्सारी, मशाक अन्सारी, वाजिद‎ अन्सारी, नबी शेख, नाबिद शेख,‎ मेहबूब अन्सारी,नय्यूम अन्सारी,‎ युसुफ अन्सारी, पवन क्षिरसागर,‎ लखन वाघमारे,अकबर शेख,‎ आकाश चव्हाण, अकबर अन्सारी,‎ मुजमील अन्सारी,आदीसह ग्रामस्थ‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...