आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेशभूषा:श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शाळांमध्ये 85 वर बाळगोपाळांची सुंदर वेशभूषा

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शहरातील कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिरात गुरूवारी (दि १८) श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने राधाकृष्ण वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला. ८५ चिमुकल्यांनी वेशभूषा करून सहभागी झाले होते. मुख्याध्यापक कविराज रेड्डी, मलंग विद्यालयाचे मुख्याद्यापक अजित गोबारे यांच्यासह शिक्षक पालकांची उपस्थिती होती.

महात्मा बसवेश्वर विद्यालय
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शहरात श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक माधवराव माने, मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, लिपिक रमेश होदलूरकर उपस्थित होते. शिक्षक माधव माने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कृष्णा च्या बालपणीच्या रंजक कथा आणि गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. . शिक्षक रामदास कुलकर्णी, संजय कोथळीकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. जन्माष्टमीप्रमाणे शाळांनी गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचा कार्यक्रमही ठरविला आहे.

भाजपच्या वतीने आज वेषभूषा स्पर्धा
भाजपतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध गटांसाठी शुक्रवारी दि १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रतिष्ठान भवन,उस्मानाबाद येथे श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपर्क- ओम नाईकवाडी ९१३०४३११११ प्रीतम मुंडे ९९२२२००२०५

बातम्या आणखी आहेत...