आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच बाळासाहेब रामभाऊ जाधव, सदस्य अभिमन्यू निवृत्ती लिके, चांद जिलानी शेख, सौ. अलका पांडुरंग लोकरे, सौ. जबीदाबी फकिरा सय्यद, सौ. अनिता विक्रम भंडारे, भैरवनाथ देविदास जाधव हे विक्रमी मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत. यापूर्वीही मागील पंचवार्षिक मध्ये भंडारे सरपंच यांनी उत्कृष्ट काम केल्याने खेर्डा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पॅनलला भरघोस अशा मताधिक्याने निवडून दिलेले आहे.
सरपंच बाळासाहेब जाधव हे उच्चशिक्षित असल्याने ते खेर्डा गावचा विकास चांगल्या प्रकारे करतील त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी त्यांना भरघोस मताधिक्याने विजय केलेले आहे. यावेळी महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शब्बीर मिया सय्यद, विनायक माणिकराव लोकरे, किसन राजाराम जाधव, साहेबराव भाऊराव जाधव, छगन भाऊराव जाधव, गणेश महादेव लोकरे, नरसू परसराम लोकरे, सोमनाथ शिवराम लिके, अनंत त्रिंबक लिके, अजित सुधाकर जाधव,रणजीत साहेबराव जाधव, विक्रम भीमराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश आल्याने सर्व ग्रामस्थांनी गावात पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.